जैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली पिलीसांच्या विशेष पथकाने एक महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यांनी जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी बसीर अहमदला श्रीनगरमधून अटक केली आहे. तो २०१५ पासून फरार होता.

२०१५ पासून फरार असलेल्या या दहशतवाद्याला शोधून काढण्यासाठी तब्बल २ लाखांचे बक्षिस जाहीर झाले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला त्याच्याविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपास करत कारवाई केली आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवादी यांच्यात २००७ साली चकमक झाली होती. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर बसीरला अटक करण्यात आली होती. परंतु, त्यावेळी तो जामीनावर सुटला होता. नंतर हाय कोर्टाने सर्व दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तो फरार होता.