‘जैश- ए- मोहम्मद’चा कमांडर खालिदचा खात्मा

टीम महाराष्ट्र देशा : जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर अबू खालिद हा सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता. खलिद ऑक्टोबर २०१६ पासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता.

मुळचा पाकिस्तानमधील असणारा खालिद जम्मू काश्मीरमध्ये जैश- ए- मोहम्मदच्या दहशवादी संघटनेचा कमांडर होता. मागील आठवड्यात श्रीनगरजवळ सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर हल्ला दहशतवाद्यानी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले, तर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. या हल्यापासून अबू खालिद हा सुरक्षा यंत्रणाच्या रडारवर आला होता.

 

 

You might also like
Comments
Loading...