दहशतवादी मसूद अझहरच्या पुतण्याची भारतात घुसखोरी; सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट

blank

श्रीनगर : जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरचा पुतण्या आणि मसूदच्या लहान भावाचा माजी अंगरक्षक हे दोघे भारतात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. दोघेही भारतात आल्याने गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मसूद अझहरचा मोठा भाऊ इब्राहिमचा मुलगा मोहम्मद उमर याने मेच्या शेवटच्या आठवड्यात काश्मीरमार्गे भारतात घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. याच महिन्यात मसूदचा लहान भाऊ अब्दुल रौफचा अंगरक्षक व जैशचा कमांडर मोहम्मद इस्माइल याने देखील भारतात घुसखोरी केल्याची माहिती आहे. ‘आयसी ८१४’ या विमानाच्या अपहरणात रौफ हा मुख्य आरोपी आहे.

भारतात घुसखोरी करताच इस्माइल दिल्लीत गेला होता. तिथून काही दिवसांनी तो पुन्हा काश्मीरमध्ये परतला. दिल्लीत दहशतवादी हल्ल्यांसाठी त्याने संघटनेने जाळे तयार केले असावे, असा अंदाज आहे. इस्माइल हा पुलवामा ते श्रीनगर दरम्यान कुठे तरी लपून बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट देण्यात आला आहे.

मी भारतात परतलो तर लोक मला मारून टाकतील – मेहुल चोक्सी

सुरक्षा रक्षकांच्या सावधगिरीमुळे वाचले व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती