जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

BSF-JAWAN,indian army

जम्मू-काश्मीर : काश्मीरमधील बांदिपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवलं आहे मात्र या दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना दोन जवान शहीद झाले आहेत ज्यात महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा समावेश आहे.

बांदिपोरामधील हाजिन भागात आज पहाटे पासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरु होता . भारतीय जवानांकडून या भागात सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे.दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून हि कारवाई करण्यात आली . यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली.दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले. दोन शहीद जवानांपैकी एक धुळ्यातील साक्री गावामधील असल्याची माहिती समजते आहे. दरम्यान, दहशतवाद्यांच्या हल्यात एक जवान जखमीही झाला आहे.दरम्यान, या चकमकीनंतर बांदिपोरामध्ये इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली असून अजून या भागात दहशतवादी आहेत का? याचा शोध लष्कराकडून घेतला जात आहे .