जैन समाज पदाधिकाऱ्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

सोलापूर : सैतवाळ जैन समाजाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार सुभाष गुत्तेदार यांची प्रदीर्घ काळाची साथ सोडून आमदार बी.आर.पाटील यांचे नेतृत्व मान्य करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आळंद तालुक्यात दोन प्रबळ राजकीय शक्ती असून आमदार पाटील कॉंग्रेसचे नेतृत्व करत आहेत तर माजी आमदार सुभाष गुत्तेदार भाजपचे नेतृत्व करत आहेत. गुत्तेदार यांच्या राजकीय प्रारंभापासून आळंदचा जैन समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून त्यातील सैतवाळ जैन समाज अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांनी बदलत्या राजकीय प्रवाहाचा विचार करत आमदार पाटील यांचे नेतृत्व मान्य करत कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

या बदलामागे शंकरराव देशमुख व रवींद्र कोरळ्ळी यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. कॉंग्रेसमध्ये सैतवाळ समाजाचे अध्यक्ष भारतलाल येणेगुरे, रतनलाल येणेगुरे, हुकुमचंद येणेगुरे, संजय आळंदकर, मनोजकुमार देशमाने, चंद्रगुप्त ढोले, राजकुमार येणेगुरे, राजकुमार ढोले, पंकज येणेगुरे, विजय येणेगुरे आदींनी प्रवेश केला.

You might also like
Comments
Loading...