बलात्काराच्या आरोपाखाली जैन मुनी आचार्य शांती सागर महाराजला अटक

jain-muni-acharya-shantisagar-maharaj-arrested-in-alleged-rape-case-at-surat

टीम महाराष्ट्र देशा: एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली जैन मुनी आचार्य शांती सागर महाराजला(४९) सुरत पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. जैन मुनीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी आपल्या पालकासोबत महाराजचा आशीर्वाद घेण्यासाठी गेली होती. परंतु महाराजाने तिला पूजा करण्याच्या नावाखाली वेगळ्या रुममध्ये नेले व तिच्यावर बलात्कार केला. भीतीच्यापोटी पीडित तरुणीनं हा प्रकार कोणाला सांगितला नाही परंतु पालकांना विश्वासात घेतल्यानंतर पीडित तरुणीनं ११ दिवसानंतर पोलीस ठाण्यात महाराजविरुद्ध तक्रार दाखल केली.

पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर महाराजविरुद्ध गुन्हा दाखल केला व मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मुनीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराजचे हजारो समर्थक पोलीस ठाण्यासमोर जमले होते.