जैन इंटरनॅशनल स्कुल प्रकरणी चौकशी समिती नियुक्त, आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

Z.P. Taluka level sports competition started among teachers and staff

औरंगाबाद : दर्गाह रोड, शहानूरवाडी येथील द जैन इंटरनॅशनल शाळेच्या बाबतीत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून, फुलंब्री पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी यांनी आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरज प्रसाद जैस्वाल यांनी दिले आहेत.

सदरील शाळेने पालकांकडून ट्युशन फी पेक्षा जास्त पैशांची मागणी करणे, ऑनलाईन शिक्षणाची लिंक बंद करणे, स्टेशनरी व गणवेशाची खरेदी शाळेकडूनच करण्याचे बंधन घालणे, मागील वर्षीचा निकाल राखून ठेवणे आदी तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.

त्या अनुषंगाने चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून, फुलंब्री पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी यांनी आठ दिवसात आपला चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी सुजरप्रसाद जैस्वाल यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP