१०० कोटींची संपत्ती आणि अवघ्या तीन वर्ष्याच्या मुलीला सोडून हे दांपत्य. . .

आजच्या काळात कोणी १०० कोटींची संपती आणि आपल्या मुलीला सोडून सन्यास घेणार आहे अस ऐकल्यावर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र हे सत्यात होणार आहे, मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यात राहणारे सुमित आणि अनामिका राठोड हे दांपत्य आपल्या १०० कोटींच्या संपत्तीवर तुळशीपत्र ठेवत सन्यास घेणार आहे. या जोडप्याला अवघ्या तीन वर्ष्याची चिमुकलीही आहे.

‘हिंदुस्तान टाईम्स’नं दिलेल्या वृत्तानुसार, ३५ वर्षीय सुमित राठोड आणि त्यांची पत्नी २४ वर्षीय अनामिका २३ सप्टेंबर रोजी गुजराच्या सुरतमध्ये दीक्षा घेणार आहेत. आचार्य रामलाल महाराच त्यांना दीक्षा देणार आहेत.

एवढी मोठी संपत्ती आणि त्यातच तीन वर्षाच्या मुलीला सोडून राठोड पती-पत्नीच्या सन्यास घेण्याच्या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केल आहे. दरम्यान अनामिका यांचे वडील यांनी मुलगी आणि जावयानं संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या मुलीची जबाबदारी आपण घेणार असल्याचं त्यांनी म्हटल आहे.