‘वारी नाही रे’ गाण्यातून वारकऱ्यांची व्यथा, जयदीप बगवाडकरचे नवे गाणे प्रदर्शित

मुंबई : कोरोनामुळे आषाढी एकादशीच्या वारीवर निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. वारकऱ्यांची हीच मनःस्थिती प्रसिद्ध गायक जयदीप बगवाडकरने ‘वारी नाही रे’ या गाण्यातून मांडली आहे.

‘सावळ्याचे नाव ओठी, भेटीची ही भूक मोठी, माउलीची आस राही रे . . .वारी नाही रे’ या बोलातूनच वारकऱ्यांच्या मनाची अवस्था व्यक्त होते. २० जुलै आषाढीच्या मुहूर्तावर जयदीपने हे नवीन गाणे प्रदर्शित केले आहे. या गीताचे लेखन अश्विनी शेंडे केले आहे. तर श्रेयस जोशी आणि प्रणव हरिदास यांनी ते संगीतबद्ध केले आहे. जयदीप बगवाडकरने या गाण्याला आपला सुरेल आवाज दिला आहे.

सर्वसामान्यांचे दैवत असलेले विठ्ठल यांच्या भेटीसाठी हजारो भाविक पायी चालत ‘विठ्ठलनामाचा गजर’ करत पंढरपूर गाठतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे या आनंदाला वारकरी मुकले. हीच मनाची द्विधा ‘वारी नाही रे’ या गाण्यातून मांडली गेली आहे. यावेळी गायक जयदीप बगवाडकरने पुढच्या वर्षी तरी वारी व्हावी असे साकडे विठ्ठलाला घातले असल्याचे व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP