जय हिंद…पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

रिपब्लिक डे

मुंबई : देशभरात 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे, कोरोना महामारीनंतर प्रथमच तिरंग्याला सलामी देण्यासाठी देशवासीय एकत्र येत आहेत. कोरोनाच्या सावटामुळे यंदाचाही कार्यक्रम कमी लोकांमध्येच साजरा होत आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणेच उत्साह आणि देशभक्तीमय वातावरण देशभर पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच ट्विट करुन देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशवासीयांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! जय हिंद… असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. देशभरात गावपातळीपासून ते दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत तिरंगा ध्वज फडकावून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. दिल्लीच्या राजपथावरही परेडचा मोठा सोहळा पार पडणार आहे. कोरोनामुळे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, भारतीय सैन्य दलाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच भारतीय संचलनात राफेल या अत्याधुनिक लढाऊ विमानांसह टी -90 रणगाडे, समविजय इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, सुखोई -30 एमकेआय लढाऊ विमानांसह आपल्या सैन्य शक्तीचे प्रदर्शन करेल.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राजपथावर १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ, संरक्षण मंत्रालयाचे सहा चित्ररथ, इतर केंद्रीय मंत्रालये आणि निमलष्करी दलाच्या ९ चित्ररथांसह ३२ चित्ररथांद्वारे देशातील समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि सैन्याच्या शक्तीचा शानदार झलक दिसून येईल. ‘शालेय विद्यार्थी लोकनृत्य सादर करतील. कालाहांडीचे मनमोहक लोकनृत्य बजासल, फिट इंडिया मूव्हमेंट आणि स्वावलंबी भारतासाठी मोहिमेची झलकही दिसून येईल.

महत्वाच्या बातम्या