fbpx

जगतापांना अभय तर १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

टीम महाराष्ट्र देशा : महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या १८ नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली असून शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. मात्र आमदार संग्राम जगताप यांना अभय मिळाले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा आदेश काढला आहे.

अहमदनगर महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा भाजपाला दिला. या अभद्र युतीमुळे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. शिवसेनेला सवार्धिक २४ जागा मिळवूनही महापौर पदापासून वंचित राहावे लागले. राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा दिल्याने राजकिय वर्तुळात चर्चा रंगल्या. पक्षाध्यक्ष शरद पवार अहमदनगर येथे आले असता पाठींबा देणारांवर कडक कारवाई करणार असल्याच सांगितल होत. त्यानंतर जयंत पाटील यांनी ही कारवाई केली. मात्र आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही.