मुंबई : आपल्याकडे जास्तीत जास्त लोकांना चहा प्यायला खूप आवडते. पण असं म्हणतात की जास्त चहा पिणे शरीरासाठी घातक असतो. पण तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल की गुळाचा चहा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. जर तुम्ही दररोज चहा पीत असाल तर मग गुळाचा चहा प्या यामुळे तुमचे आरोग्य सदृढ राहील. चला तर मग जाणून घेऊया गुळाच्या चहाबद्दल सविस्तर माहिती.
गुळामध्ये व्हिटॅमिन ए आणि बी, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, सुक्रोज, ग्लुकोज, कॅल्शियम, लोह, इत्यादी प्रकारचे जीवनसत्वे असतात. त्यामुळे गुळाचा चहा पिल्यास आरोग्यास खूप फायदा होतो.
जाणून घ्या गुळाचा चहा पिण्याचे फायदे –
– शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता असेल तर गुळाचा चहा पिल्याने रक्त वाढण्यास मदत होते आणि अशक्तपणा दूर होतो.
– गुळाचा चहा नियमित पिल्याने आपल्या शरीराची पच- नक्रिया व्यवस्थित राहते.
– जर थकवा जाणवत असेल तर अवश्य गुळाचा चहा प्यायला पाहिजे त्यामुळे थकवा दूर होतो.
– जर तुमचे वजन जास्त असेल तर वजन कमी करण्यासाठी देखील गुळाचा चहा उपयुक्त ठरतो.
– गुळाचा चहा पिल्याने सर्दी, खोकला, घसादुखी या छोट्या छोट्या समस्या दूर होतात
महत्वाच्या बातम्या :