जगदंब क्रीएशन्स आणि स्वराज्यजननी जिजामाता मालिकांचं एक दिवसाचं मानधन पूरग्रस्तांसाठी

blank

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने कोल्हापूर, सांगली, कराड आदी भागांत प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. अशा आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, यासाठी अमोल कोल्हेंच्या मालिकांचं एक दिवसाचं मानधन पूरग्रस्तांसाठी कोल्हापूर आणि सांगली मधील पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर ‘जगदंब क्रिएशन या निर्मितीसंस्थेच्या बॅनरखाली ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता दोन मालिकांच्या कलाकरांनी पूरग्रस्तांना मदत मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच जगदंब क्रिएशन अमोल कोल्हे यांची निर्मितीसंस्था आहे.

दरम्यान, अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे जगदंब क्रिएशननं सोशल मिडीयावर पोस्ट करून ही माहीती दिली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पवसाने पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदीन जीवन विस्कळीत झाले आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत आहे.

blank blank

तसेच, पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत कानार आहेत. या भेटीत त्यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे हेही असणार आहेत.

‘सांगली येथील पूरग्रस्तांना करमाळा वरून मदतीसाठी गेलेल्या बोटीने अनेकांना काढले बाहेर’

 

पाणीपुरवठा योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही

 

कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात येत्या 48 तासात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा