जगनमोहन रेड्डींचा मोठा निर्णय; आंतरजातीय विवाहासाठी ४१ कोटींची तरतूद

टीम महाराष्ट्र देशा : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन्मोहन रेड्डी यांनी अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाने राज्यातील पहिले बजेट आंध्र प्रदेश विधानसभेत मांडले. या बजेटमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Loading...

माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी गेल्यावर्षी आंतरजातीय विवाहासाठी चंद्रान्ना पेल्ली कनुका अशी योजना सुरु केली होती. आणि आता मुख्यमंत्री जगन मोहन सरकराने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी ४१ कोटी रुपयांची तरतूद २०१९ च्या बजेटमध्ये केली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढेल, अशी आशा आहे.

दरम्यान, या योजनेमध्ये अनुसूचित जातीच्या मुलाने अनुसूचित जातीच्या मुलीसोबत लग्न केलं तर सरकार त्याला ४० हजार रुपये देत होते. इतर मागासवर्गीय मुलाने इतर मागासवर्गीय मुलीसोबत लग्न केलं तर सरकारकडून ३० हजार रुपये दिले जात होते. मात्र आता नव्या बजेटच्या तरतुदीनुसार ही रक्कम वाढणार आहे.Loading…


Loading…

Loading...