विराटवर निशाणा साधणाऱ्या बार्मी आर्मीला जाफरचं सडेतोड उत्तर ; ट्विट होतयं व्हायरल

vasim jafar

इंग्लंड : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. नेहमीच भारतीय खेळाडूंच्या बचावात ट्विट करताना दिसतो. वसीम जाफर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांच्यामध्ये सोशल मीडियावर जोरदार टीकास्त्र चालू असतात. मायकेल वॉन भारतीय खेळाडूंवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. वसीम जाफर देखील भारतीय खेळाडूंच्या बचावात मायकेल वॉनला सडेतोड उत्तर देताना दिसतो.

यावेळी मात्र मायकेल वॉनने नाही तर इंग्लंड क्रिकेट टीमची सपोर्टर बार्मी आर्मीने विराटवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. यावेळीही वासिम जाफरने विराटच्या बचावात इंग्लंड क्रिकेट टीमची सपोर्टर बार्मी आर्मीला चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे.

झाले असे की, बार्मी आर्मीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जाफर आणि विराट कोहलीचा एक जुना फोटो शेयर केला. शेअर केलेल्या या फोटोत विराटच्या हातात धनुष्य बाण आहे. या फोटोला कॅप्शन दिले की, ‘विराट कोहली इंग्लंड सीरिजमधून बाहेर, कारण तो टोकयोमध्ये तिरंदाजीची तयारी करत आहे,’

विराट कोहलीवर निशाणा साधल्यानंतर वसीम जाफरने बार्मी आर्मीला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. जाफरने त्यांच्या ट्विटला रिट्विट करत लिहिले की, बार्मी आर्मी का बार आर्मी? असा सवाल त्याने विचारला. यासोबत जाफरने गँग्स ऑफ वासेपूरचं एक मीमही शेयर केलं आहे. जाफरने केलेल्या या ट्विटमुले आता विराटवर निशाण साधणाऱ्या बार्मी आर्मीलाचं नेटकरी जोरदार ट्रोल करू लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या