कौतुकाने सर रविंद्र जडेजा म्हणणाऱ्या समालोचकाला जडेजाचे मन जिंकणारे उत्तर

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे अनेक खेळाडू मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत.

या स्पर्धेत चेन्नईच्या संघाने दमदार पुनरागमन केले होते. चेन्नईचा अष्टपैलु खेळाडु जडेजाच्या कामगीरीला तर कोणीच विसरु शकत नाही. आरसीबीविरुद्ध जडेजाने केलेल्या अष्टपैलु कामगीरीने सर्वाना मोहित केले होते. भारताचा प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगलेने त्याचे कौतुक करताना जडेजाचा उल्लेख हा ‘सर रविंद्र जडेजा’ असा केला होता. यानंतर जडेजाने एक ट्विट करत हर्षा भोगले यांचे आभार मानत त्याना म्हणाला की मला आनंद होईल जर तुम्ही मला केवळ रविंद्र जडेजा म्हणले तर आवडेल.

रवींद्र जडेजाने केलेले हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. यास्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने ७ सामन्यापैकी ५ सामन्यात विजय मिळवला होता तर २ सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. रद्द झालेली आयपीएल स्पर्धा पुन्हा कधी सुरु होईल हे सांगता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या