इंग्लंड दौऱ्यासाठी जडेजा करतोय जय्यत तयारी ; पहा व्हिडीओ

जडेजा

मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकेसाठीच्या टीम इंडियाची (शुक्रवारी) निवड करण्यात आली.

जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रवींद्र जाडेजा व हनुमा विहारी या दोघांचे टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले.

टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं सध्या भारतीय क्रिकेटपटूंना ब्रेक मिळाला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं या ब्रेकमध्ये वेळ वाया न घालवता इंग्लंड दौऱ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.

जडेजा सध्या जामनगरमधील त्याच्या फार्म हाऊसमध्ये आहे. तो सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची जोरदार तयारी करताना दिसत आहे. नुकताच त्यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP