मुलीच्या वाढदिवसानिमित्त जडेजाने केलं ‘हे’ अभिमानास्पद काम

जडेजा

इंग्लंड : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे. टीम इंडियासोबत जडेजा देखील इंग्लंड दौऱ्यावर आहे.

दरम्यान, सध्याच्या कोरोना संकटानं सगळ्या देशाला वेठीला धरलं आहे. लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत. जगायचं कसं असा प्रश्न लाखो लोकांसमोर उभा राहिला आहे. अशा गंभीर परिस्थिती क्रिकेटपटू मदतीचा हात देताना दिसत आहेत. जमेल तशी मदत करताना दिसत आहेत.

आता रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रीवा देखील मदतीसाठी पुढे आले आहेत. सध्या रवींद्र जडेजा इंग्लंड दौऱ्यावर असून सोबत त्याची पत्नी आणि मुलगी निध्यानाही आहे. नुकताच निध्याना हिचा चौथा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्तानं त्यानं आणि त्याच्या पत्नीनं पाच गरीब कुटुंबांना आर्थिक मदत केली आहे. या कुटुंबातील मुलींच्या नावानं पोस्टात बचत खाती उघडण्यात आली असून, त्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. रवींद्र जडेजा आणि त्याच्या पत्नीनं दहा हजार गरीब मुलींची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. रीवानं व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या मुलींना पासबुक प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. जडेजाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP