रणवीर सोबत आता ‘अंगूर’मध्ये जॅकलिन आणि पूजा हेगडेची एन्ट्री

ranvir singh

मुंबई : कॉप ड्रामा सिंबा या चित्रपटनानंतर पुन्हा एकदा रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग एकत्र काम करणार आहेत. दिग्दर्शक रोहित आणि रणवीर सिंग यांचा हा सिनेमा पूर्णपणे एक कॉमेडी ड्रामा असणार आहे. रणवीर सिंगचा हा चित्रपट गुलजार यांचा कल्ट क्लासिक कॉमेडी  ‘अंगूर’, ज्यामध्ये संजीव कुमार आणि देवेन वर्मा लीड रोल मध्ये दिसले होते, याच सिनेमाचा रिमेक दिग्दर्शक रोहित शेट्टी बनवत आहे. या सिनमेमध्ये रणवीर सिंग संजीव कुमार यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी एक विनोदी चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत.  हा चित्रपट गुलजारच्या कल्ट कॉमेडी, अंगूरचे रूपांतर आहे आणि यात रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. रणवीर सोबत पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिज देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.

रणवीर, रोहित, पूजा हेगडे, जॅकलिन पाहील्यांदाच सोबत काम करताना दिसणार आहेत. कोरोना परिस्थितीमुळे बॉलीवूड मधील बरेच प्रोजक्ट पुढे ढकलण्यात आले, अनलॉक नंतर बॉलीवूड मधील सिनेमांची शूटिंग परत सुरु करण्यात आली, परिस्थिती पुरेशी स्थिर झाल्यावर पुन्हा काम सुरू करण्यासाठी सुपरस्टार आणि दिग्दर्शक आपले आगामी वेळापत्रक ठरवत आहेत.

महत्वाच्या बातम्या-