दंगेखोरांवर पीडीपी- भाजप  सरकार मेहरबान

kashmir-pelting-

टीम महाराष्ट्र देशा – जम्मू काश्मीर सरकार सध्या दंगेखोरांवर चांगलेच मेहरबान झाले असून मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी २०१४ पर्यंत दगडफेक आणि आंदोलनात सहभागी झालेल्या चार हजारहून अधिक युवकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.मागील वर्षी राज्य सरकार आणि पोलीस महासंचालक वैद्य यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या उच्च स्तरीय समितीच्या शिफारशीनंतर काश्मिरी युवकांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत मुफ्ती म्हणाल्या, आम्ही एक समिती नेमून त्यांना याप्रकरणी चौकशी करण्यास सांगितले होते. आम्ही आणखी एक आदेश जारी करून समितीला वर्ष २०१५, १६ आणि १७ मध्ये नोंदवलेल्या प्रकरणांची चौकशी करून १० दिवसांच्या आत अहवाल सोपवण्यास सांगितले आहे. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या माध्यमातून आम्ही येथील युवकांना आयुष्यात स्थिरस्थावर होण्यास मदत करू शकतो.गेल्यावर्षी दाखल करण्यात आलेल्या हजारो युवकांवरील तक्रार मागे घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.