नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत

नांदेड: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत जनतेने स्पष्टपणे काँग्रेसला बहुमत दिले असून हे मतदान पक्षीय आरोप प्रत्यारोपाच्या पलिकडे जावून चव्हाण कुटुंंबियांच्या नांदेडकरांशी पिढयानपिढया असलेल्या नात्यालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी शासकीय तंत्रनिकेतनात मतमोजणीला सुरूवात झाली निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख हे तिथे हजर होते.

पोस्टल बॅलेटनंतर 20 प्रभागातील 81 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली. मतमोजणी पहिल्या आर्ध्या तासात 18 जागांचे कल बाहेर आले होते. काँग्रेसला 10 जागांवर आघाडी तर भाजपाला 8 जागांवर आघाडी होती. सुरूवातीला हैदरबाग भागातील निकाल पुढे आले. पहिला निकाल काँग्रेसच्या बाजुने आला .शेरअली (काँग्रेस) 5537 विजयी झाले तर पराभूत प्रतिस्पर्धी एमआयएमचे बासिद यांना 2418 मते पडली. त्यानंतर काँग्रेसचे रजिया बेगम बाबू, मसूद खान, आसिया बेगम हबीब हे देखील  विजयी झाले.

Loading...

शिवाजी नगर प्रभाग ब- काँग्रेसच्या मोहिनी येवनकर विजयी झाल्या तर दुपारी बाराच्या दरम्यान भाजपाने खाते उघडले. कौठा प्रभागातून भाजाच्या शांता गोरे या विजयी झाल्या. भाग्यनगर भागात फारुख अली खान, महेंद्र पिंपळे, जयश्री पावडे विजयी,अपर्णा नेरलकर विजयी झाले .दुपारी एकपर्यंत काँग्रेसी सदोतीस जागांवर आघाडी होती तेव्हाच कॉग्रेस निर्विवाद बहुमत मिळवणार हे सिध्द झाले होते. आता संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर फक्त यावर शिक्कामोहर्तब झाला आहे.

या निविडणुकीत कॉग्रेसचे 81 ,भाजपचे 80 तर शिवसेनेच्या 63 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. एकूण साठ टक्के मतदान झाले होते. तर नोटाचा अधिकारही सात हजारपेक्षा अधिक लोकांनी वापरला होता.

कसा झाला कॉंग्रेसचा विजय 

या निवडणुकीत अपेक्षे प्रमाणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आपला बालेकिल्ला राखण्यात यशस्वी झाले आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये एमआयएम कडे वळलेला कॉग्रेसचा मतदार स्वगृहि परतला असून मराठवाडयात एमआयएमला भवितव्य नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

एकेकाळी कॉग्रेसच्या प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेचे तीन तेरा वाजले आहेत तर मुळात नांदेडमध्ये फाससे अस्तित्व नसलेल्या भाजपलाही जनतेने नाकारले आहे. विधानसभांपासून ते ग्रामपंचायती निवडणुका किंवा छोटया मोठया पोटनिवडणुकांत भाजप आघाडीवर असताना नांदेडमध्ये कॉग्रेस विजयी कशी असा प्रश्न या निवडणुकांकडे दुरून पाहणा-यांना पडू शकतो. पण याचे यश माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांज्या पासून ते अशोक चव्हाण ,अमिता चव्हाण यांच्या परंपरागत जनसंपर्काचे,आणि केलेल्या कामाचे आहे.

व्यापारी महासंघ,शिक्षण संस्था,गुरूव्दारासारख्या धार्मिक संस्थां किंवा लिंगायत,कोमटी समाजासारख्या संघटना असो यांच्या छोटया मोठया समस्यांकडे दोघांही चव्हानांनी जातीने लक्ष दिले आहे, राज्याचा कारभार सांभाळताना या पितापुत्रांनी त्यांचा बेस असलेल्या नांदेडच्या जनतेकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. छोटया दुकानदारानं जर चव्हाणांना उदघाटनासाठी बोलावले तर ते त्याच्या भावना समजून घेवून आवश्य भेट द्यायचे. नांदेड मधील प्रत्येक कुंंटुंबाशी कोणत्या न कोणत्या माध्यमातून ते पिढ्यानपिढ्या संपर्कात राहिले. वातावरण कसही असो आपला बालेकिल्ला कसा राखता आला पाहिजे यांचे प्रात्याक्षिक म्हणजे नांदेडची निवडणूक आहे अशा प्रतिक्रीया येत आहे.

भाजप आणि शिवसेनेने खरा प्रतिस्पर्धी बाजुला ठेवून एकमेकांवरच आरोप प्रत्यारोप केले. स्थनिक निवडणुकीतही शिवसेनेच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदीवर टीका करण्याचे सोडले नाही.या पक्षांनी वस्तुस्थिती लक्षात घेवून एकत्र निवडणूक लढवली असती तर निदान काही जागा जास्त निवडून आल्या असत्या अशाही प्रतिक्रीया येत आहेत. भाजपने प्रचाराचा धडाका लावला होता तरी भाजपच्या तिकीटावर लढणारे अनेक नगरसेवक व कार्यकर्ते हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे होते त्यांची स्थिती या निवडणूकीत घर का ना घाट का अशी झाली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'