F U- आकाशच्या नवीन सिनेमाचा टीजर लॉंच

सैराटच्या यशानंतर अल्पावधीतच प्रकाशझोतात आलेला आकाश ठोसर F.U. या चित्रपटातून एका ट्रेंडी लुक मध्ये आपल्या समोर येत आहे. धमाकेदार अशा F.U. या चित्रपटाचा भव्य टीजर लॉंच सोहळा मुंबईत पार पडला. यानंतर अगदी काही तासांतच या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
या चित्रपटात आकाश सोबत सत्या मांजरेकर, मयूरेश पेम, शुभम किरोडीयन, माधव देवचक्के, पवनदीप, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे, स्वामिनी वाडकर, रिया बर्मन, राधा सागर, मधुरा देशपांडे, स्वरदा ठिगळे हे तरुण सहकलाकार आहेत तर सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, शरद पोंक्षे, स्व. अश्विनी एकबोटे, भारती आचरेकर आणि महेश मांजरेकर, बोमन इराणी आणि इशा कोप्पीकर हे सुप्रसिद्ध कलाकार या टीजरमध्ये दिसत आहेत.
You might also like
Comments
Loading...