मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही ; एकनाथ खडसे यांनी केलं राजीनामा वृत्ताचे खंडन

जळगाव:मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही,अशा स्पष्ट शब्दात उत्तर देत जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपण भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पेटाळले आहे.बर्याच दिवसांपासून एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.आणि आज अचानक खडसेंनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त आले.परिणामी एकच गोंधळ उडाला होता.

पण यावर खुद्द नाथाभाऊंनीच पडदा टाकल्यामुळे या वृत्ताला पूर्णविराम मिळाला आहे.

याचबरोबर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याविषयी मला काही माहिती नाही. तसेच, त्यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, एकनाथ खडसे हे पक्षांतर करतीलच असे खात्रीलायक उत्तर अनेक राजकीय पंडित देत आहेत.त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या-