‘अश्विनला खेळवलं नाही म्हणून बरं झालं, नाहीतर…’; इंग्लंडच्या फलंदाजाने व्यक्त केल्या भावना

ashwin

नवी दिल्ली : 10 सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळला जाणार होता. मात्र, या अंतिम कसोटी सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करून पुढे ढकलण्यात आला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आता टी २० वर्ल्डकपनंतरच होईल असं सांगण्यात येत आहे. दरम्यान चार कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांची चमकदार कामगिरी पाहायला मिळली.

भारताच्या या आक्रमक गोलंदाजीवर आता इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू डेविड मलान यानं प्रतिक्रिया दिली आहे. डेविड मलान या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघात खेळत होता. मलानने या मालिकेत चांगली फलंदाजी केली. मात्र, फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांचा सामना करणं कठीण जात असल्याची कबुली त्याने दिली आहे.

मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारखे गोलंदाज जर संघात असतील त्यांच्या समोर टिकणे खूप कठीण होते. तर दुसरीकडे त्याने आर. अश्विनला संधी न दिल्याबद्दल मलानने आनंद व्यक्त केला आहे. “मी डावखुरा फलंदाज आहे आणि मला आनंद आहे की अश्विनला खेळवलं नाही. त्यामुळे माझा त्रास थोडा कमी झाला.”, असंही त्याने पुढे सांगितलं. तसच आर. अश्विन जागतिक दर्जाचा गोलंदाज असल्याचं देखील सांगायला तो विसरला नाही.

महत्त्वाच्या बातम्या