fbpx

देणार होते नोकऱ्या ,हाती आल्या टोकऱ्या; बेरोजगारीवर जितेंद्र आव्हाड यांची कविता

टीम महारष्ट्र देशा – राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या अहवालानुसार भारतातील बेरोजगारीच्या दरानं गेल्या 45 वर्षांचं रेकार्ड मोडलं आहे. त्याचा अहवाल ट्विटरवर शेअर करत बेरोजगारीवर जितेंद्र अव्हाड कविताच केली आहे.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या अहवालामुळे मोदी सरकारचं पितळ उघडे पडले आहे. भारतातील बेरोजगारीच्या दरानं गेल्या 45 वर्षांचं रेकार्ड मोडलं असून 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6.1 टक्के होता, असं NSSO च्या पीएलएफएस रिपोर्टमधून स्पष्ट झाल्याचं समोर आले आहे.

जितेंद्र अव्हाड यांची ट्विटरवरील कविता

‘हे घ्या देशातल्या बेरोजगरीनी गाठला निचांक
देणार होते नोकऱ्या
हाती आल्या टोकऱ्या
नशिबी बेकारी
नाही पैसे खिश्यात
घरी आईबाबा आजारी
मोठ्या आशेनी केले मोदी तुम्हाला मतदान
500 रुपया साठी आताच करून आलो रक्तदान’