मला जबाबदारी मुक्त केले तर बरं होईल- सुनील तटकरे

sunil tatkare

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षश्रेष्ठींकडे चार वर्ष प्रदेशअध्यक्ष म्हणून काम केले आता मला जबाबदारी मुक्त केले तर बरं होईल, अशी मागणी केली आहे. शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांच नाव राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या चर्चेत आहे.

राष्ट्रवादीच्या नवीन प्रदेश अध्यक्ष निवड २९ एप्रिलला पुण्यात होणार असून प्रदेश अध्यक्षपदी पुन्हा इच्छुक नसल्याच सांगत नवीन नियुक्त करावे असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. तटकरे म्हणाले, पक्ष श्रेष्ठी यांना मी सांगितले आहे की मी चार वर्ष प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केले आता मला जबाबदारी मुक्त केले तर बरं होईल. मी जितके वेळ द्यायचा तितका वेळ दिला. पक्ष वाढवण्यास प्रयत्न केले.

सुनील तटकरेनंतर सांगलीतील जयंत पाटील आणि सातारा जिल्हातील शशिकांत शिंदे यांची नावे चर्चेत असून जयंत पाटील हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय आहेत. तर सातारा येथील शशिकांत शिंदे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांवर निर्णय घेणार आहेत.