राज्याचा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी जे प्रकल्प योग्य नाही ते थांबवणार

jayant patil

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसरकारवर तब्बल पावणे सात लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. या सर्व कर्जाची परत फेड कशा पद्धतीने करता येऊ शकते, याचा आढावा घेण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. अशी माहिती राज्यमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

ते म्हणाले,  राज्याचा हितासाठी काही प्रकल्प आवश्यक आहे. तर काही प्रकल्प नंतर करता येतील का, याबाबत विचार करत आहोत. भाजप सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. त्यांची फसवणूक केली. असे काही शेतकरी म्हणत आहेत. गेल्या सरकारने सारासार विचार न करता केवळ हवेत घोषणा दिल्या. आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व बाबीचा विचार करून पुढील निर्णय घेतले जातील, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना म्हणाले की, खातेवाटपासंदर्भात कुठलाही घोळ नाही. लवकरच निर्णय होईल. तो मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. बुलेट ट्रेन पांढरा हत्ती आहे. बुलेट ट्रेन सारखे काही प्रकल्प नंतर करता येतील का याचा विचार आम्ही करत असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...