धोनीला धावा करणे कठीण जाणार : गौतम गंभीर

gambhir

नवी दिल्ली : आयपीएल 2021 चा दुसरा भाग यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दिवशीचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. आयपीएल पूर्वी सर्वच टीम कसून सराव करताना दिसत आहेत. कोणी मैदानावर घाम गाळत आहे. तर कोणी हॉटेल रूममध्येच सराव करताना दिसत आहेत.

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामने या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. स्पर्धेचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहेत. क्रिकेट फॅन्समध्ये आता आयपीएलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यावेळी यूएईमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असल्यानं त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत झाला आहे.

दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीरने चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या बॅटिंगबाबत विधान केलं आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीला बॅटिंग करताना धावा करणं अवघड जाणार असल्याचं वक्त्यव्य गंभीरने केलं आहे. ‘धोनी साधारण चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करायला येतो. मात्र धोनी आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात 6-7 व्या फलंदाजीसाठी उतरला. काही वेळा तर धोनीने स्वत: आधी सॅम करनला बॅटिंगसाठी पुढच्या क्रमांकावर पाठवलं. कदाचित यामागे धोनीचा विकेटकीपिंग आणि मेन्टरपदाकडे वळण्याचा प्रयत्न असावा. जेणेकरुन धोनीला आणखी जोराने कर्णधारपदासह विकेटकिपींग करता येईल’

पुढे गंभीर म्हणाला, ‘धोनीला धावा करणं अवघड ठरतंय. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएलमध्ये खेळणं आव्हानात्मक ठरतं. आयपीएलमध्ये तुम्हाला अव्वल आणि विश्व स्तरावरच्या गोलंदाजांचा सामना करावा लागतो’, असंही गंभीर म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या