ऑस्ट्रेलियाच्या बॉलरचा सामना करणं सगळ्यात कठीण नव्हतं, मात्र…

pujara

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या  ब्रिस्बेनमध्ये झालेल्या शेवटच्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी चेतेश्वर पुजाराने 56 रनची साहसी खेळी केली. गिलनंतर आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेनेही आक्रमक खेळ केला, परंतु ऑसी गोलंदाजांनी पुजाराला जायबंदी करण्याचा डाव कायम ठेवला. जोश हेझलवूडचा एक चेंडू पुजाराच्या अंगठ्यावर एवढ्या जोरात आदळला की त्यानं बॅट फेकली आणि अंगठा पकडून मैदानावर बसला. तो रडायलाच आला होता, पण संघासाठी प्राथमिक उपचार घेऊन तो पुन्हा उभा राहिला. ऑस्ट्रेलियाच्या बॉलरचा सामना करणं सगळ्यात कठीण नव्हतं, मात्र त्रासदायक होतं, कारण तुम्ही स्वत:ची विकेट देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया पुजाराने दिली.

ऑस्ट्रेलियाच्या बॉलरचा सामना करणं सगळ्यात कठीण नव्हतं, मात्र त्रासदायक होतं, कारण तुम्ही स्वत:ची विकेट देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया पुजाराने दिली. या सीरिजमध्ये पुजाराच्या संथ खेळीवर अनेकांनी टीका केली होती, यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगयाचाही समावेश होता. यावरही पुजाराने उत्तर दिलं आहे.

‘बॅट्समन म्हणून टीमला काय पाहिजे, ते मला माहिती आहे. आपल्याला स्वत:च्या पद्धतीवर विश्वास असला पाहिजे. बोटाच्या दुखापतीमुळे मला बॅटिंग करणं सोपं नव्हतं. मला खूप दुखत होतं. मेलबर्नमध्ये सराव करत असताना मला दुखापत झाली. सिडनी आणि ब्रिस्बेनमध्ये मला बॅटही हातात नीट पकडता येत नव्हती. ब्रिस्बेनमध्ये पुन्हा बॉल लागला तेव्हा दुखापत आणि त्रास वाढला. मी चार बोटांनी बॅट पकडली होती,’ असं पुजारा म्हणाला.

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे च्या नेतृत्वावरही पुजारा बोलला. ‘मी कोणाचीही तुलना करणार नाही. विराट परत गेला होता. आम्ही पहिली टेस्ट हरलो होतो. अनेक खेळाडूंना दुखापत झाली होती, त्यामुळे अजिंक्यसमोरही अडचणी होत्या. पण अजिंक्यने ज्यापद्धतीने आपल्या बॉलर्सचं समर्थन केलं, ते कौतुकास्पद होतं. तो खूप शांत होता. पहिल्या पराभवानंतर आम्ही एकजूट राहिलो आणि सीरिज जिंकू शकतो हा विश्वास ठेवला,’ असं पुजाराने सांगितलं.

‘ऍडलेड टेस्टचे पहिले दोन दिवस आम्ही आघाडीवर होतो. तिसऱ्या दिवशी फक्त एका तासाच्या खेळामुळे आम्ही मॅचमधून बाहेर झालो. पण ज्या पद्धतीने आम्ही पुनरागमन केलं, ते माझ्या करियरमधलं सर्वोत्कृष्ट होतं,’ असं वक्तव्य पुजाराने केलं. इंग्लंडविरुद्धच्या आगामी सीरिजबाबत विचारलं असता, अहमदाबाद आणि चेन्नई भारतासाठी चांगली मैदानं आहेत. आम्हाला घरच्या मैदानात खेळायचा फायदा होईल, पण इंग्लंडची टीम चांगली आहे, त्यामुळे आम्ही त्यांना हलक्यात घेणार नाही. श्रीलंकेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे, असं पुजारा म्हणाला.

महत्वाच्या बातम्या