मुंबई : महाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर देखील शिवसेनेचा त्रास कमी होत नाहीये. माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. याआधी त्यांचा मुलगा आणि आमदार योगेश कदम हेही शिंदे गटात दाखल झाले होते. माजी आमदार राम कदम शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेवर टीका करत आहेत. रामदास कदम यांचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी गेल्या महिन्यात मतभेद झाले होते आणि त्यांनी शिवसेनेतून बाजूला झाल्याची तक्रार केली होती. परब यांच्याशी झालेल्या वादामुळे कदम हे शिवसेना सोडतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र रामदास कदम आता थेट शिवसेनेवर हल्लाबोल करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांच्या पाठित खंजीर खुपसला, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
रामदास कदम म्हणाले, “उद्धव ठाकरेंना मी माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन. त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व ठेवलं असतं तर मी त्यांना निश्चितपणे शिवसेना पक्षप्रमुख म्हटले असते. पण ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम करत नाहीत. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी ही दुर्देवाने उद्धव ठाकरे यांच्याकडून झाली आहे.”
रामदास कदम एका वृत्तवाहीनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना प्रश्न केले आहेत. कोण गद्दार आहेत याचे आत्मपरीक्षण करुन बघा, ५१ आमदार का जातात, १२ खासदार का जातात. शकडो नगरसेवर का जाताता?, असा प्रश्न रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. सध्या शिवसैनिकांना भावनात्मक ब्लॅकमेक करण्याचे काम सुरू आहे. तीन वर्षात आमदारांना भेटले असते तर ही वेळ आली नसती, असे रामदास कदम म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- मुरली विजयला मैदानात पाहून चाहते म्हणायला लागले डीके..डीके..डीके; पाहा VIDEO!
- Eknath Shinde meet Ratan Tata | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रतन टाटा यांची सदिच्छा भेट
- Sandeep Deshpande : “हा पझेसिव्हनेस आहे की असुरक्षितता?”, मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
- Uddhav Thackeray : बाळासाहेबांना दिलेले वचन अजूनही अपूर्ण!, उद्धव ठाकरे मुलाखतीत असे का म्हणाले?
- महाराष्ट्र सुपर मॉडेलचा महाअंतिम सोहळा संपन्न
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<