मी ‘जानवे’ नाही तर ‘दानवे’ गळ्यात घालावे, असे म्हटलो होतो- विलास लांडेंची सावरासावर 

danave vr lande

पिंपरी:  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात  “भाजपमध्ये गेलो असतो, तर जानवे घालावे लागले असते. जे मला मान्य नव्हते” असे विधान केले होते.  त्यानंतर समस्त ब्राह्मण समाजाकडून या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान , विलास लांडे यांनी सावरासावर  करण्यास सुरवात केली आहे . मी जानवे नाही तर दानवेंना गळ्यात घालावे लागले असते,  असे म्हणालो.  कुणी काही म्हणेल मी भाजपचे दानवे म्हटलो होतो.  माझ्या देवघरात शरद पवारांचा फोटो आहे.  त्यांची मी पूजा करतो.  त्यांना सोडून मी दानवेंना कुठे गळ्यात घालू.  मी ‘जानवे’ नाही तर ‘दानवे’ म्हटलो होतो.  मला ब्राह्मण समाजाविषयी आदर आहे.  माझ्या वक्तव्याचे राजकारण केले जात आहे. असे ते म्हणाले.

Loading...

विलास लांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्त्य साधुन कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात भोसरीत शुक्रवारी (दि. १) गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  दरम्यान , बोलतांना लांडे यांची जीभ घसरली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, माजी महापौर हनुमंत भोसले, रंगनाथ फुगे, योगेश बहल, मोहिनी लांडे, वसंत लोंढे आदी उपस्थित होते.

कोण आहेत विलास लांडे ?

राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा लोकप्रतिनिधीत्व केले आहे. एकदा अपक्ष, तर एकदा राष्ट्रवादीचे आमदार होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी विलास लांडे यांचा दारूण पराभव केला. या निवडणुकीत लांडे हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
शरद पवार सुरक्षा काढून घेतली ही अफवा,यामध्ये काही तथ्य नाही : अमृता फडणवीस