रोहित शर्माच्या विश्वासानेच माझ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले केले – सूर्यकुमार यादव

रोहित शर्माच्या विश्वासानेच माझ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले केले – सूर्यकुमार यादव

surykuma yadav rohit sharma

मुंबई : सध्या इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर उभय संघांमध्ये पाच टी२० सामन्यांची टी२० मालिका खेळविली जाईल. या मालिकेसाठी शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात मुंबईकर सूर्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्थान मिळाले आहे. बीसीसीआयची निवड समिती टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला संधी देली गेली आहे. बीसीसीआयला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तगडा संघ उभा करायचा आहे.

त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणारे तसेच आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंना संधी दिली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादव याला देखीलया मालिकेत संधी दिलेली आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळालेली.

भारतीय संघात प्रथमच निवड झाल्याचे श्रेय सूर्यकुमारने मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला दिले आहे. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘मला वाटत माझ्यासाठी मुंबई इंडियन्सचा पाठींबा खूप महत्वाचा होता. मला अजून आठवतंय २०१८ मध्ये मी जेव्हा केकेआर मधून मुंबई इंडियन्समध्ये परत आलो होतो. केकेआरमध्ये माझी भूमिका पूर्ण वेगळी होती. मला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागत होती, मला फिनिशरची भूमिका पार पाडावी लागत होती.’

‘मात्र, मुंबई इंडियन्स मध्ये योजना स्पष्ट होती. त्यांच्यासाठी मी एक टॉप ऑर्डर फलंदाज होतो. त्यांनी मला तीच जबाबदारी दिली. मला  मुंबई इंडियन्सने आव्हान दिल होत की मी मैदान जाव अन् बेधडक खेळावं. मी देखील तेच केलं. या दरम्यान माझ्या खेळाचं मुंबई इंडियन्सने भरपूर समर्थन केले. ज्या पद्धतीने कर्णधार रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सने माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवला ते माझ्यासाठी खूप सकारत्मक होते. मागच्या ३ वर्षपासून यामुळे मी खेळाचा आनंद घेत आहे. कर्णधार रोहित शर्माने माझ्यावर खूप विश्वास दाखवला आहे. त्यामुळेच आज माझ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले झाले आहेत.’ असे मत सुर्यकुमार यादव याने व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या