fbpx

मुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील 

कोल्हापूर : मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेपेक्षा आमचे दोन नगरसेवक कमी आहेत. तिथे आमचा महापौर करणे काहीच अवघड नव्हते; परंतु केवळ युती टिकण्यासाठी व कॉंग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यासाठी आम्ही सगळ सबुरीने घेतले आहे. भोगावती नदीवर बांधलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, आम्ही कामे कमी आणि घोषणा जास्त करतो, अशा प्रकारची टीका आमच्यावर सातत्याने शिवसेनेचे मुखपत्र सामनातून होते असते. शिवसेनेचे आमदार अनेक विकासकामांची उद्‌घाटने करीत आहेत, त्या उद्‌घाटनांची वस्तुस्थिती पक्षप्रमुखांना बहुतेक सांगत नसावेत.

अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेला राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्ष पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहे असा चिमटाही त्यांनी राष्ट्रवादीला काढला. राष्ट्रवादी हा कॉंग्रेसला केवळ सत्तेसाठी हवा असल्याची टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.