‘बेल बॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून लारा दत्ताला ओळखणे झाले कठीण; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

laraa datta

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने काही दिवसापुर्वी त्याचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहताच यातील अभिनेत्री लारा दत्ता हिचा लुक पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. लारा या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी लाराने फार मेहनत घेतली आहे. यासाठी लाराला प्रोस्थेटिक्स मेकअप करावा लागला होता. यानंतर लाराचे सोशल मिडियावर प्रचंड कौतुक केल जाता आहे.

‘बेल बॉटम’ या चित्रपटाचा ट्रेलरमध्ये अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडला आहे. येत्या १९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे असे अक्षय आणि बेल बॉटमच्या टीमने सांगितले. यादरम्यान अक्षयने या चित्रपटासंदर्भात आणखी एक नवी घोषणा केली होती टी म्हणजे ‘बेल बॉटम’ हा चित्रपट थ्रिडी मध्ये प्रदर्शित होणार आहे.

यादरम्यान हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल अशी चर्चा देखील सुरु होती. बेल बॉटम या चित्रपटाचे कथानक १९८० च्या दशकावर आधारित असून, यात अक्षय कुमार रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या कलाकार देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

महत्त्वाच्या बातम्या