मुलगा झाल्याचा आंनद साजरा करणे पडलं महागात; कोरोनाग्रस्त पित्यामुळे 116 लोकं क्वारंटाईन

blank

नांदेड : मुलगा झाल्याचा आनंदोत्सव साजरा करणं २४ वर्षीय पित्याला चांगलच महागात पडलं आहे. मुलगा झाला म्हणून गावात त्याने पेढे वाटले. मात्र नंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने वाटलेले पेढे खाल्लेल्या ११६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील काटकळंबा गावात ही घटना घडली. तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने गावाची अक्षरशः झोप उडाली आहे. प्रशासकीय यंत्रणेने आता खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील केला आहे. गावात आरोग्य कर्मचारी पथक, पोलीस, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यासह सामाजिक टीमचा राबता वाढला आहे.

संबंधित 24 वर्षीय तरुण औरंगाबाद येथील कंपनीत काम करतो. 4 जुलै रोजी मुलगा झाला म्हणून पाहण्यासाठी तो नांदेडमधील कंधार तालुक्यातील गावाकडे आला. आपल्या मुलाला पातंरड येथे भेटला आणि गावाकडे परतला. त्याच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ बहीण आहेत. दोन दिवसात तो गावातच आजोळी मामा-मामीलाही भेटला. मुलगा झाल्याच्या आनंदात त्याने गावात, मित्र मंडळीत पेढे वाटले.

त्याच्या संपर्कात आतापर्यंत 116 जण आले असून त्या सर्वांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केलं आहे. न्हाव्याकडे संपर्क झाल्यामुळे नऊ जणांना कंधार येथे स्वॅबसाठी पाठवण्यात आलं आहे. रुग्णाच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचं काम तातडीने चालू केलं आहे. गावात भीतीचं वातावरण पसरु नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

दरम्यान, नांदेड शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता 10 दिवसाचा लॉकडाऊन करावा, अशी मागणी महापौर दीक्षा धबाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील रुग्णसंख्या 500 च्या वर गेल्याने 15 ते 25 जुलै दरम्यान शहरात लॉकडाऊन करावा अशी मागणी महापौरांनी केली आहे.

पारनेरच्या प्रकरणावर मुश्रीफ म्हणतात, ‘तेव्हा हे ठरलेच नव्हते….’

दिल्लीत 200 युनिट पर्यंत वीज मोफत, महाराष्ट्रात मात्र भरमसाठ बिले पाठवली जात आहेत

माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे – संभाजीराजे