बॉलीवूडमध्ये टिकणे झाले अवघड, कंगनाच्या हातातून निसटले अनेक ‘एंडोर्समेंट’

kanagan

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत कोणालाही लक्ष्य करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. कंगना नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलेब्रिटीपर्यंत सर्वांनाच वेठीस धरते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि राज्य सरकार यांच्यात झालेला वाद हा चांगलाच पेटला होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगणारे मुंबई पोलिसांच्या तपासासह राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. यानंतर हा वाद शिवसेना विरुद्ध कंगना असा झाला होता. यानंतर कंगना सातत्याने वादग्रस्त वक्त्यव्यामुळे चर्चेत आली आहे.

मात्र, यामुळे यामुळे कॉन्ट्रोव्हर्सी क्वीला बराच मनःस्तापदेखील सहन करावा लागला आहे. एकेकाळी कंगनाकडे अनेक ब्रॅण्ड्सचे एंडोर्समेंट्स होते, मात्र आता तिच्या काहीच उरले नाही. आता ग्लॅमरच्या दुनियेत कंगनाला टिकणे अवघड होत चालले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्म पुरस्कार आपल्या नावी करणा-या कंगनाने आपल्या कामामुळे प्रत्येकाचेच मन जिंकले होते. परंतु मार्केट तज्ज्ञांच्या मते, तिचे ब्रँड व्हॅल्यू कमी होण्याचे कारणही ती स्वतःच आहे. प्रत्येक मुद्यावर रोखठोक मत व्यक्त करणे आणि इंडस्ट्रीतील लोकांशी थेट थेट पंगा घेणे, तिला महागात पडले आहे. यामुळे, बहुतेक ब्रँड्सनी तिच्यासोबतचे करार मोडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP