पुणे : महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्री असे अचानक कोरोना ग्रस्त होऊ लागल्याने अनेकांनी शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे. दरम्यान,मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. संदीप देशपांडे म्हणाले की, ‘सावधान सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे, त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो.’ या आरोपानंतर अनेक मविआ समर्थक मला ट्रोल करतील, पण जे सत्य आहे ते बोलणारच, असा इशारा देशपांडे यांनी दिला होता.
सावधान सध्या करोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो.टीप-ह्या नंतर अनेक मा वि आ समर्थक मला ट्रोल करतील पण जे सत्य आहे ते बोलणारच
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 22, 2021
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना मनसेची चांगलीच थट्टा केलेली होती. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही टीका केलेली होती, त्या म्हणाल्या होत्या कि, “विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी व्हावा म्हणून राज्य सरकार कोरोनाची खोटी आकडेवारी जाहीर करतंय असं मनसेच्या संदीप देशपांडे याचं स्टेटमेंट ऐकण्यात आलं आहे. मला वाटतं आपल्या शॅडो मंत्रिमंडळातील जे कुणी शॅडो गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून याची चौकशी समिती नेमून योग्य ती शॅडो कारवाई करण्यात यावी” अशा प्रकारे चाकणकर यांनी मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाची थट्टा केलेली होती.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी व्हावा म्हणून राज्य सरकार कोरोनाची खोटी आकडेवारी जाहीर करतंय असं मनसेच्या @SandeepDadarMNS याचं स्टेटमेंट ऐकण्यात आलं.(1/2)
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 22, 2021
मला वाटतं आपल्या शॅडो मंत्रिमंडळातील जे कुणी शॅडो गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून याची चौकशी समिती नेमून योग्य ती शॅडो कारवाई करण्यात यावी.(2/2)@NCPspeaks @thodkyaat @MaxMaharashtra @MySarkarnama @MHD_Press @TV9Marathi @abpmajhatv @News18lokmat @JayMaharashtrN @zee24taasnews
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 22, 2021
यामुळे संतप्त झालेल्या पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही टीका केलेली आहे. ठोंबरे त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाल्या कि, “सत्ता आल्यावर उर्मी येतेच का? विसरले का सत्ता नसतानाचे दिवस दम लागतो शॅडो मंत्रिमंडळ स्थापन करायला आणि काम करायला ही. गुलाल तिथे चांगभले सोपे हो, जरा सत्ताधारी म्हणून काम करून दाखवा. ओपन चॅलेंज तुम्हाला बंदे मैं है दम हम ही है बाजीराव सिंघम.” अशा आशयाच ट्वीट करत त्यांनी चाकणकरांना प्रतिउत्तर दिलेले आहे.
सत्ता आल्यावर उर्मी येतेच का?विसरले का सत्ता नसतानाचे दिवस
दम लागतो शॅडो मंत्रिमंडळ स्थापन करायला आणि काम करायला ही.
गुलाल तिथे चांगभले सोपे हो, जरा सत्ताधारी म्हणून काम करूच दाखवा.ओपन चॅलेंज तुम्हाला
बंदे मैं है दम हम ही है बाजीराव सिंघम https://t.co/joYQw1AF2k— Rupalipatilthombare (@Rupalipatiltho1) February 22, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राठोड यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका आम्हीही सांगतोय – नाना पटोले
- सोशल मीडियावर ब्रह्मज्ञान, निवडणूक अर्ज भरताना कोरडे पाषाण!
- अहो दानवेजी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ऐकायचं नाही असं ठरवलं काय?
- भाजप आ.नमिता मुंदडा यांनी केली मागणी, महाविकास आघाडी सरकारने घेतली दखल
- देवीच्या गावात महिला उपेक्षित! नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव, पण पदावर पुरूष विराजमान