‘…ती गोडसे प्रवृत्ती देशात रुजता कामा नये’

अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : देशात ज्या प्रवृत्तीने महात्मा गांधींची हत्या केली आहे ती गोडसे प्रवृत्ती देशात रुजता कामा नये,असे अजित पवार यांनी बजावले आहे. ते राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्र्त बोलत होते.

Loading...

काल राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तनयात्रा सोलापुर जिल्हातील अकलुज येथे दाखल झाली. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील, माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.

आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यांना मी अभिवादन करतो. पण आज मी एक व्हिडिओ पाहिला. काही जातीयवादी लोक महात्मा गांधींचा फोटो समोर ठेवून त्याला गोळ्या घालत आहेत आणि तो व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. या भाजपा सरकारच्या काळात महात्मा गांधींचा अपमान केला जातोय आणि हे सरकार गप्प बसतंय. ज्या प्रवृत्तीने महात्मा गांधींची हत्या केली ती गोडसे प्रवृत्ती देशात रुजता कामा नये, असे पवार यावेळी म्हणाले.Loading…


Loading…

Loading...