fbpx

कर्जमाफीचा ऑनलाइन घोळ; आयटीचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची बदली

मुंबई: शेतकरी कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळाचे खापर अखेर आयटी विभागाचे प्रधान सचिवांवर फुटले आहे. आयटीचे प्रधान सचिव असणारे विजयकुमार गौतम यांची बदली करण्यात आलीय. गौतम यांच्या बदलीनंतर एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्याकडे आयटी विभागाचा कार्यभार असणार आहे.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये सर्व अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननीकरून कर्जमाफीची लाभार्थी यादी तयार करण्यात आली होती. मात्र यामध्ये अनेक चुका असल्याने कर्जमाफी वाटपात घोळ निर्माण झाला. त्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठली होती.