मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाकडून एकमेकांवर टीकास्त्र सोडले जात आहेत. काहीजण विनोदाच्या माध्यमातून एकमेकांवर टीका करत आहेत. अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले. टीका टिप्पणीचं हे सत्र सुरू असतानाच अजित पवार आणि जयंत पाटील यांनी विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जावई असा उल्लेख केला.
“तुम्ही आमचे जावई आहात त्यामुळे सासरकडच्यांची काळजी घ्या” असा सल्ला अजित पवार यांनी नार्वेकर यांना दिला. अजित पवारांच्या या सल्ल्याला उत्तर देत राहुल नार्वेकर यांनी पलटवार केला आहे. “अजित पवार यांनी माझा उल्लेख जावई असा केला. जावई असल्यामुळे लेफ्ट बाजूची काळजी घेण्याची माझी जबाबदारी आहे असं अजित पवार यांचे म्हणणं आहे. पण उलट जावई म्हणून माझी काळजी घेणे तुमच्या सर्वांवर अधिक जबाबदारी आहे. त्यामुळे तुमच्याकडून सहकार्य मिळेल याची अपेक्षा” असं नार्वेकर म्हणाले.
“खाली बसताना मी जास्त ऐकायचो आणि कमी बोलायचो. वर बसताना मला तीच भूमिका बजावावी लागणार आहे.” असं राहुल नार्वेकर म्हणाले. विधानसभा ज्या मतदारसंघात येते त्याच मतदारसंघाचा मी आमदार आहे. त्यामुळे सत्र काळात आणि निसत्र काळात अध्यक्ष म्हणून २४ तास तुम्हाला भेटेन. असे आश्वासन नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
त्याबरोबरच सभागृहात चार माजी विधानसभा अध्यक्ष आहेत. हरिभाऊ बागडे, नाना पटोले, दिलीप वळसे पाटील आणि कार्याध्यक्ष नरहरी झिरवळ. माझ्यासाठी ही बहुमानाची गोष्ट आहे असं देखील राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<