त्याच्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचं, तो सेहवागसारखा फलंदाज आहे; पृथ्वी शॉच्या समर्थनार्थ माजी निवडसमिती सदस्याने मांडले मत

मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगीत झाल्यानंतर बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यातील संघात निवडसमितीने पुन्हा एकदा सलामीवीर पृथ्वी शॉला संधी नाकारली. पृथ्वी शॉला संघातून डावलल्याबद्दल निवड समितीचे माजी सदस्य सरनदिप सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरनदिपने पृथ्वी शॉची तुलना भारताचा माजी क्रिकेटपटु विरेंद्र सेहवागसोबत केली आहे. ते म्हणाले, ‘सेहवाग मध्ये जी क्षमता होती तीच क्षमता पृथ्वी शॉमध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर पृथ्वी शॉने देशातंर्गत क्रिकेट स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तसेच त्याने यादरम्यान स्वत: मधील उणीवावर त्याने काम करत सुधारणा केली. या परिस्थीतीत त्याला सतत डावलणे चुकीचं आहे.’ असे ते म्हणाले.

जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे पृथ्वी शॉला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले. मात्र यानंतर शॉने विजय हजारे करंडक स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी करत जोरदार पुनरागमन केले. तसेच आयपीएल २०२१ स्पर्धेतही त्याने ८ सामन्यात ३०८ धावा केल्या. यात त्याने ३ अर्धशतकेही झळकावली

महत्त्वाच्या बातम्या

IMP