भविष्यात आंबेडकर जयंती साजरी होईल की नाही याची काळजी वाटते :तुषार गांधी

tushar gandhi

पुणे : सध्या लोकशाही व्यवस्था,न्यायालये खिळखिळी करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे राष्ट्राचे अस्तित्व राहील की नाही ,की नव्या व्यवस्थेचे आपण गुलाम होऊ ,याची काळजी आहे . पुढील काळात आंबेडकर जयंती साजरी करता येईल की नाही याचीही चिंता वाटत असल्याचे मत महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी केले. पुण्यातील क्रांतीज्योती ‘संस्था आयोजित ”वैचारिक भीमजयंती’ कार्यक्रमात ते बोलत होते .

काय म्हणाले तुषार गांधी.

सध्या लोकशाही व्यवस्था,न्यायालये खिळखिळी करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे राष्ट्राचे अस्तित्व राहील की नाही ,की नव्या व्यवस्थेचे आपण गुलाम होऊ ,याची काळजी आहे . पुढील काळात आंबेडकर जयंती साजरी करता येईल की नाही याचीही चिंता वाटते.ज्या शक्तींनी बापूना मारले आणि बाबासाहेबांना बाजूला केले ,सध्या त्याच शक्ती आंबेडकरांच्या नावात आतापर्यंत नसलेला राम जोडत आहेत .त्यांच्या मनातील डाव ओळखून त्यावर मात केली पाहिजे .बापूंचा राष्ट्रविचार आणि बाबासाहेबांच्या संविधान विचाराला याच शक्ती चूड लावू पाहत आहेत .