‘आंदोलन मागे घ्यायचं की चालू ठेवायचं, याचा निर्णय कामगारांनी घ्यावा’

‘आंदोलन मागे घ्यायचं की चालू ठेवायचं, याचा निर्णय कामगारांनी घ्यावा’

गोपीचंद पडळकर

मुंबई: राज्यात गेले काही दिवस सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे दोन मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, प्रशासनातील अधिकारी, एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनधी तसंच आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत (MLC Sadakhau Khot) सहभागी झाले होते. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची घोषणा अनिल परब (Anil Parab) यांनी केली.

शासनाने नेमलेली समिती विलीनीकरणाबाबत निर्णय घेईपर्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. ही पगारवाढ नोव्हेंबरपासून देऊ असंही सरकारने म्हटलं. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी अंतरिम पगारवाढ मान्य नाही आम्हाला विलिनीकरणच हवं आहे या मागणीवर कर्मचाऱी ठाम आहेत.
यानंतर गेले १६ दिवसापासून राज्यातील एसटी कामगारांचं आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा आमदार सदाभाऊ खोत (MLC Sadakhau Khot) आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

एस.टी. कर्मचारी आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये फूट पडलेली स्पष्ट दिसते आहे. कारण, सदाभाऊ खोत यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्राच्या इतर भागात सुरु असलेलं आंदोलन सुरु ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे असंही खोत आणि पडळकर म्हणाले आहेत.

हे आंदोलन कामगारांनी उभं केलं आहे, त्यामुळे त्याबाबतचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा. आज यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिना दिवशी कामगारांनी निर्णय घ्यावा. आझाद मैदानावरचं आंदोलन तात्पुरतं मागे घेत आहोत. बाकी राज्यभरातलं आंदोलन मागे घ्यायचं की तसंच ठेवायचं, याचा निर्णय कामगारांनी घ्यावा, असं वक्तव्य आज पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकरांनी केले केलं आहे. आंदोलन चालू ठेवलं तर त्यांना पाठिंबा राहिलच, मात्र तो निर्णय त्यांनीच घ्यावा, असं मतही  पडळकरांनी यांनी मांडले.

महत्वाच्या बातम्या