विज्ञानयुगात चाकाखाली लिंबू ठेवणे हे दुर्दैव : अनिस

टीम महाराष्ट्र देशा : विजयादशमीचा मुहूर्त साधत भारताच्या हवाई दलात राफेल लढाऊ विमान हे दाखल झाले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत फ्रांस येथे काल राफेल विमान हास्तंतरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजनाथसिंह यांनी आपल्या संस्कृती प्रमाणे राफेल विमानाचे पूजन केले. तर विमानाच्या चाका खाली लिंबू ठेऊन पूजन केले. यावरून राजनाथसिंह यांना चांगलाचं ट्रोल करण्यात आले आहे. यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितेचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून आता 70 वर्ष झाली आहेत. तरीदेखील विमानाच्या चाका खाली लिंबू वगैरे ठेऊन आपण चुकीच्या परंपरेचे पालन करत आहोत, असे मत मिलिंद देशमुख यांनी मांडले आहे. मुळात म्हणजे विमानाच्या उड्डाणा वेळी चाका खाली लिंबू ठेवले आहे की नाही याबाबत शहानिशा केली पाहिजे. जर तसे असले तर हे खूप मोठे दुर्दैव आहे. विज्ञान जगात जर अशा गोष्टी करत असू आणि त्याचे समर्थन करत असू तर याचा परिणाम समाजाच्या इतर अगांवर होताना दिसतो.

दरम्यान भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांचा करार केला आहे. ज्यापैकी पहिलं विमान भारताला दसऱ्याच्या मुहूर्तावर मिळालं. फ्रान्समध्येच या विमानाची पूजा करताना सिंह यांनी विमानावर ओम काढला, हार घातला आणि चाकाखाली लिंबू ठेवलं. हा सर्व प्रकार तमाशा होता, अशा प्रतिक्रिया सोशल मिडीयावर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सध्या राजनाथसिंह चांगलेचं ट्रोल होत आहे.

महत्वाच्या बातम्या