मुख्यमंत्र्यांच्या जवळचे लोकं असे विधान करतात, हे दुर्दैवी- सुप्रिया सुळे

supriya sule , bhide

पुणे: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत. यावेळी कारण आहे ते त्यांच्या बागेतील आंब्याचं. भिडे गुरुजी यांनी काल नाशिक येथे बोलताना ‘माझ्या बागेतील आंबे खाल्यावर मुलं होतात’ असा अजब दावा केला आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात भिडेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. सुळे म्हणाल्या, “ज्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. ज्या महाराष्ट्रात महिलांच्या समतेबाबतच धोरण राभवल जात. त्या महाराष्ट्रात महिलांचा असा अपमान होण खेदजनक आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे लोकं असे विधाने करतात. हे दुर्दैवी असून एक स्त्री आणि एकी आई म्हणून मी भिडेंच्या या वक्तव्याचा निषेध करते.”

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संभाजी भिडे हे वादात सापडले होते. ही दंगल घडवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, आता नाशिक येथे बोलताना भिडे यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले होते संभाजी भिडे

लग्न होऊन 10 – 15 वर्ष झालेल्यांनाही पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.

3 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...