टीम महाराष्ट्र देशा: एकीकडे जगाची लोकसंख्या जवळपास 8 अब्जांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे लोकसंख्या नियंत्रणाची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये भारत आणि चीन या देशांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. जगात जिथे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तिथे जगात असे एक शहर आहे ज्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ ऐकून तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल. हे जगातील सर्वात छोटे शहर (Smallest Town in the World) आहे. या शहरामध्ये फक्त 27 लोक राहत असून या गावाचे क्षेत्रफळ 100 मीटर आहे. जगातील या छोट्या गावाचा इतिहास जाणून घेण्यासाठी जर तुम्ही उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जगातील सर्वात छोट्या शहराबद्दल माहिती सांगणार आहोत.
जगातील सर्वात छोटे शहर (Smallest Town in the World)
जगाच्या नकाशावर क्रोएशिया नावाचा एक देश आहे. या क्रोएशिया देशाची राजधानी झाग्रेब आहे. झाग्रेब हे शहर जगातील सर्वात छोटे शहर आहे. या शहरांमध्ये काही पावलं चालल्यावर या शहराची हद्द संपते असे म्हणतात.
जगातील सगळ्यात छोट्या शहराची लोकसंख्या
झाग्रेब या जगातील सगळ्यात छोट्या शहरांमध्ये तब्बल 27 लोक राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार, सेंट्रल इस्ट्रियामधील या छोट्या शहराची लोकसंख्या 21 होती. म्हणजे तेव्हा या शहरांमध्ये फक्त 21 लोक राहत होते. दर 2021 च्या जनगणनेनुसार, या शहराच्या लोकसंख्येमध्ये 6 लोकांनी वाढ झाली असून या शहराची सध्याची लोकसंख्या 27 आहे.
100 मीटर क्षेत्रफळामध्ये बसलेले आहे जगातील सर्वात छोटे शहर
जगातील सर्वात छोटे शहर फक्त 100 मीटर लांबी आणि 30 मीटर रुंदी मध्ये बसलेले आहे. त्यामुळे या शहरांमध्ये चालायला सुरुवात केली की लगेच शहराचे क्षेत्रफळ संपते. जगातील हे छोटे शहर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येत असतात असे येथील लोक सांगतात. त्याचबरोबर या ठिकाणच्या लोकांचा उत्पादनाचा मुख्य स्त्रोत पर्यटन आणि शेती आहे.
महत्वाच्या बातम्या
- Devendra fadnavis | ही भारत जोडो नाही तर अपोजिशन जोडो यात्रा – देवेंद्र फडणवीस
- Devendra Fadnavis | केजरीवालांसारख्या खोट्या लोकांना गुजरातमध्ये काही मिळणार नाही – देवेंद्र फडणवीस
- क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! ‘टी-20 विश्वचषक 2007’ वर लवकरच प्रदर्शित होणार वेब सिरीज
- Devendra Fadnavis | “महात्मा गांधींचे पत्र तुम्ही वाचले का?” ; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार!
- Devendra Fadanvis | “हे सावरकरांसाठी सत्ता सोडू शकत नाहीत”; संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार