चार-पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा; निलेश राणेंचा घणाघात

nilesh rane vs shivsena

सिंधुदुर्ग: कोरोना महामारीच्या काळात देखील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत होत. तर, भाजपासह महायुती व अनेक शेतकरी संघटनांनी मिळून दूध उत्पादकांच्या भाववाढीसाठी आक्रमक आंदोलन पुकारलं आहे. २० जुलैला इशारा आंदोलन केल्यानंतर काल १ ऑगस्ट रोजी राज्यभरात आक्रमक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावेळी अनेक विरोधकांनी सरकारमध्ये असलेल्या पक्षांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले.

राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरमधील सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. “हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे”, अशी खरमरीत टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली होती.

मुंबईसह धारवीचं ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केलं पुन्हा कौतुक

यावर सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिलं होत.खासदार लोखंडे यांनी,  ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत’, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला होता.

#सामना_रोखठोक:…तर पंतप्रधान मोदींवर देखील राजीनाम्याची वेळ येऊ शकते!

यात आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील उडी घेतली आहे. निलेश राणे यांनी, ‘ आम्हाला माहीत आहे चार पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा आहे… पुरावे द्यायची पण गरज नाही कारण जग जाहीर आहे. हा खासदार आहे, म्हणजे आपल्याला कळलं असेल हा दिल्लीला जाऊन काय करत असेल,’ अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या आमदार, खासदारांवर केली आहे. त्यामुळे, दूध उत्पादकांच्या भाववाढीचा प्रश्न अजून सुटला नसला तरी राजकीय नेत्यांचे टीकास्त्र सुटल्याने राज्यात दिसून येत आहे.

भक्ती शक्ती संगम -श्रीसमर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती..!

IMP