प्रत्येक गोष्टीवर टीका टिप्पणी करणे हेच भाजपचे काम; छगन भुजबळांचा टोला

chagan bhujbal

मुंबई : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारला सळो कि पळो केले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. आज भाजपने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत.

दरम्यान आता विरोधकांचा हा रोष पाहता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारनं एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. तशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

छगन भुजबळ यांनी याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना एका पत्रकाराने प्रश्न केला. दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवादी पकडल्यानंतर भाजपने महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांना टार्गेट करण्यास सुरुवात केलं आहे. त्यावर तुमचं मत काय? असा सवाल भुजबळ यांना करण्यात आला.

त्यावर भुजबळांनी आपल्या खास शैलीत त्याला उत्तर दिलं. भाजपचं कामच ते आहे. प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवणं हे त्यांचं कामच आहे. प्रत्येक गोष्टीवर टीका टिप्पणी करणं हेच त्यांचं काम आहे. दुसरं काम काय त्यांना? इतर राज्यात त्यांचं सरकार आहे तिथे काय होत आहे. तिथे पाहा म्हणावं, असा चिमटा भुजबळांनी काढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या