मुंबई : राज्यामध्ये शिंदे-फडणवीस असं नवं सरकार स्थापन झालं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल मुंबईत आणि ठाण्यात भाजपकडून त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो नाही. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी या विषयावर भाष्य करणं टाळलं. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलं.
संजय राऊत यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावलाय. “फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणायला मला अजूनही कठीण जातंय” असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांना चिमटा काढलाय.
“मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री असं म्हणणं सोपं आहे पण मला त्यांना अजूनही उपमुख्यमंत्री म्हणणं कठीण जात आहे. पक्षाचा आदेश पाळण्याची संघाची परंपरा आहे. त्यामुळे फडणवीसांनी आदेशाचं पालन केलं त्याबाबत त्यांचं कौतुक करायला हवं” असं संजय राऊत यावेळी म्हणालेत.
यावेळी त्यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. शिवसेना सोडून कुणी शिवसैनिक होऊ शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. असं संजय राऊत यावेळी म्हणालेत. “तुम्ही वेगळी चूल मांडली असली तरी मूळ शिवसेना ठाकरेंपासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला होता. मी हरलो असतो तरी शिवसेना सोडून गेलो नसतो. मी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे” असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<