वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे

टीम महाराष्ट्र देशा – छत्रपतींच्या वाशाजांकडून पुरावे मागणे हे चुकीचेच नाही तर मूर्खपणाचे आहे आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आपण नाराज आहोत अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे बोलताने स्पष्ट केले.

तसेच राउतांचे ते विधान शरद पवार यांनीही मान्य नसल्याचे म्हटलेआहे हे त्यांनी अधोरेहीत केले. तसेच सार्वजनिक जीवनात सगळे उत्तरे माहित नसतात परंतु माहित असतात ती खरी मानायची असतात असही खडसे यावेळी म्हणाले.

Loading...

तसेच दुसरीकडे मेगाभरतीमुळेच भाजपचे कल्चर बिघडले आणि त्यामुळेच आमचे सरकार गेले अशा शब्दांत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर यावेळी दिला आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काल पिंपरीतील कार्यक्रमात याबाबतचं वक्तव्य केलं होतं. तोच धागा पकडून खडसेंनी पुन्हा मनातील खदखद व्यक्त केली. एकनाथ खडसे जळगावातील त्यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी पत्रकारांसोबत बोलत होते.

निष्ठावंतांना डावलून अगली बार २२० पार, अशी घोषणा देत नवीन लोकांना संधी दिली, त्यांना लोकांनी हरवले. मेगाभरतीचा परिणाम निश्चितच निवडणुकीवेळी झाला आहे. आता तरी पक्ष नितीमध्ये बदल करेल, असा टोला खडसेंनी लगावला आहे. मेगाभरती सुरु झाली आणि भाजपचे कल्चर थोडे विचलित झाले, अशी थेट कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.अन्य पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिल्याने नुकसान झाल्याची कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण